मध्य प्रदेशातील इंदौरच्या (Indore Temple Accident) बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात राम नवमीच्या दिवशी विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आता पर्यंत 35 भाविकांनी आपले प्राण गमावले असून 18 जणांना वाचवण्याच बचाव पथकाला यश आले आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार हा सुरु आहे. गुरुवारी रामनवमी असल्यामुळे पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिराच्या परिसरात असलेली जुनी मोठी विहीर छत टाकून बंद करण्यात आली होती. वजन सहन न झाल्याने हे छत कोसळले. यावेळी अनेक भाविक हे या विहिरीत पडले. यावेळी उपस्थित असेलेल्या नागरिकांसह, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य हे सुरु केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Extremely pained by the mishap in Indore. Spoke to CM @ChouhanShivraj Ji and took an update on the situation. The State Government is spearheading rescue and relief work at a quick pace. My prayers with all those affected and their families.
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी या दुःखद घटनेबद्दल शोक आणि दु:ख व्यक्त केले. बालेश्वर महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 50 ते 60 फूट खोल असलेल्या एका जुन्या पायरीच्या विहिरीचे झाकण, ज्यावर भाविक पूजा करण्यासाठी उभे होते, सुमारे 30 लोक त्यात पडले. खोल विहिरीत आपल्या प्रियकरांचा मृत्यू झाल्याचे पाहून अनेक लोकांनी आक्रोश सुरू केल्याने घबराट पसरली.
जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी लवकरच कारवाई केली आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले. जिल्हाधिकारी इल्लयाराजा टी. हे देखील बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पोहोचले आणि आरोग्य आणि अग्निशमन सारख्या इतर विभागांना देखील सतर्क करण्यात आले. बचाव कार्यात सामील असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विहिरीच्या वर अरुंद आणि लोखंडी रॉड असल्याने बचाव कार्यात मोठा अडथळा येत होता. एका वेळी फक्त एकच व्यक्ती आत जाऊ शकत होती आणि त्याचप्रमाणे एका वेळी फक्त एकच व्यक्ती बाहेर काढता येत होती. इलैयाराजा टी म्हणाले की, बचावकार्य अजूनही सुरू असून विहिरीतून पाणी काढले जात आहे. विहिरीत किमान 14 फूट पाणी साचले असून, ते गाळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
बावड़ी पर अधिक बोझ होने के कारण वह धंस गई। मैंने घटना की जाँच के निर्देश दिए हैं। इस दुर्भाग्यपूर्ण घटना में जिन्हें हम बचा नहीं पाए उन सब परिवारों के साथ सरकार पूरी संवेदनशीलता के साथ खड़ी है। मृतकों के परिजनों को ₹5-5 लाख व घायलों को ₹50-50 हजार की सहायता राशि प्रदान करेंगे।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 30, 2023
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांनी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.