इंदौर: ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ ऑर्डर करणे तरुणाला पडले महागात, चोरी झाले 2 लाख रुपये
online hacking | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सध्या ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी विविध अॅप सोशल मीडियात उपलब्ध आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने खाणे मागवल्यानंतर आपली फसवणुक झाल्याच्या तक्रारी ग्राहकांनी यापूर्वी केल्या आहेत. त्यातच आता भर पडली असून इंदौर (Indore) येथील एका तरुणाला ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ ऑनलाईन पद्धतीने मागवणे महागात पडले आहे.

पीडित तरुण हा इंदौर येथे राहत असून पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर ऑनलाईन पद्धतीने या तरुणाने एका अॅपच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. परंतु काही वेळातच त्याच्या बँक खात्यामधून काही ट्रांजॅक्शन झाल्याने 208 रुपये कट झाले. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याने थेट पेमेंट गेटवे कंपनीच्या कस्टमर सपोर्ट येथे फोन लावला. त्यांनी प्रथम तरुणाला त्याची तक्रार नोंदवण्यास सांगितली. मात्र कस्टमर केअरमधील फोन उचलेल्या व्यक्तीने आपणच या सर्विसचे एक्झिक्युटिव्ह असल्याची बतावणी केली. हा प्रकार कशामुळे घडला हे तपासण्यासाठी त्या व्यक्तीने तरुणाला एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितला. तसेच अॅपच्या युजर्सची अधिक माहितीसह लॉगिन आणि पासवर्ड तरुणाकडून मागून घेतला.(गुजरात: 9 रुपयांचा घोळ अंगाशी आला, 15 लाख रुपयांना मुकला; परिवहन विभागाच्या बस चालकाला झटका)

परंतु कस्टमअर केअर मधील व्यक्तीचे असे वागणे त्याला पटले नाही म्हणून तरुणाने काही पैसै बायकोच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्राजॅक्शन फेल झाले असल्याचा मेसेज त्याला आला. हा सर्व प्रकाराची माहिती तातडीने बँकेला दिली असता त्याच्या खात्यामधून 2 लाख रुपये चोरी झाल्याचे समोर आले आहे.