Indo-Myanmar Border: भारत-म्यानमार सीमेवर असम रायफल्स जवानांवर हल्ला, तीन जवान शहीद, 4 जखमी
(Photo Credit: Assam Rifles | Twitter)

भारत-म्यानमार सीमा (Indo-Myanmar Border) भागात गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ला झाला आहे. हा हल्ल्यात असम रायफल्स (Assam Rifles Unit) चे 3 जवान शहीद तर 4 गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला पीपल्स लिबरेशन आर्मी (People’s Liberation Army) या अतिरेकी गटाच्या संघटनेने केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पीएलएच्या शस्त्रधारी अतिरेक्यांनी जवानांवर सापळा रचून अचानक हल्ला केल्याचे समजते.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, म्यानमार सीमेलगत मणिपूर राज्याच्या चंदेली जिल्ह्यातील स्थानिक अतिरेक्यांनी सापळा लावला होता. यात तीन जवान शहीद झाले तर इतर चार गंभीर जखमी झाले. सांगितले जात आहे की, या हल्ल्याचा कट आगोदरच रचण्यात आला होता. या कटाला स्थानिक अतिरेकी संघटना पीपल्स लिबरेश आर्मीने प्रोत्साहन दिले होते. अतिरेक्यांनी पहिल्यांदा एक IED स्फोट केला. त्यानंतर गोळीबार केला. (हेही वाचा, Rajiv Gandhi हत्या प्रकरणातील दोषी Nalini Sriharan हिचा वेल्लोर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न)

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मणिपूरची राजधानी इंफाळ पासून 100 किलोमीटर दूर असलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी अतिरिक्त फोर्स पाठविण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, अतिरेकी संघटना चीनकडून नियमित आर्थिक सहकार्य आणि शस्त्र घेत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर पूर्व परिसरात आपले जाळे उभा करायला मदत होत आहे.