भारत केंद्रीय मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मृतांचे प्रमाण देखील कमी-जास्त होताना दिसत आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे ताज्या अपडेट्सनुसार, जगभरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत देश अव्वल स्थानावर असल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत 62 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे. ही खरच एक दिलासादायक गोष्ट असून भारताचे कोरोनाविरुद्धची लढाई ही हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे.
केंद्र आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry Of India) दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 55, 342 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 706 जणांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 71 लाख 75 हजार 881 वर (Coronavirus Cases in India) पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 1 लाख 9 हजार 856 (Coronavirus Death Cases) वर पोहोचली आहे. Aarogya Setu App: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारने लाँच केलेल्या 'आरोग्य सेतु अॅप'चे WHO कडून कौतुक; जाणून घ्या काय म्हणाले Tedros Adhanom Ghebreyesus
India's #COVID19 recoveries cross 62 lakhs; highest in the world. Active cases are below 9 lakhs for the 5th consecutive day: Rajesh Bhushan, Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/Gudxll4k7w
— ANI (@ANI) October 13, 2020
त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 62 लाख 27 हजार 296 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला देशात 8 लाख 38 हजार 729 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सलग 5 व्या दिवशी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 9 लाखांपेक्षा कमी आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात 9 ते 5 सप्टेंबरमध्ये दर दिवसा 92 हजार कोरोनाच्या केसेस समोर येत होत्या. ते प्रमाण घटून 7 ते 13 ऑक्टोबर दरम्यान 70,114 इतके झाले अशी माहिती आरोग्य मंत्रालय सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.