Ministry of Home Affairs. (Photo Credits: ANI)

MHA कडून FCRA संबंधीत नियमांमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. आता परदेशात राहणाऱ्या भारतीय नातेवाईकांना 10 लाख पर्यंतची रक्कम कुठल्याही निर्बंधाशिवाय भारतात पाठविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही महत्वाची बातमी असुन MHA कडून ही घोषणा करण्यात आली आहे.पूर्वी फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अक्ट (FCRA) नुसार परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून भारतीयांना फक्त एका वर्षात एक लाख रुपये पाठविण्याची मर्यादा होती. तर योगदान मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत केंद्र सरकारला निधीचे तपशील देणे अनिवार्य होतं.

आता केंद्रीय गृह मंत्रालयाने फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA)  संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्यानुसार आता परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून भारतीयांना एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहज पाठवता येवू शकते. तसेच यासाठी कुठल्याही नियम वा अटी नाहीत किंवा केंद्र सरकारला निधीचे तपशील कळविण्याची गरज नाही. ( हे ही वाचा :- CJI NV Ramana On Political Parties: सरन्यायाधीशांनी राजकीय पक्षांवर ओढले ताशेरे; म्हणाले, 'न्यायपालिकेने त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा द्यावा अशी पक्षांची इच्छा आहे')

तसेच FCRA च्या नवीन नियमांनुसार, जर रक्कम दहा लाखांहून अधिक असल्यास संबंधीत माहिती केंद्र सरकारला कळविण्याची गरजेचे असेल. परंतु त्यासाठी आता 30 दिवसांऐवजी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

FCRA सुधारणा नियम, 2022 गृह मंत्रालयाकडून राजपत्र अधिसूचनेद्वारे नवीन नियमांची घोषणा करण्यात आली आहे.“परकीय योगदान (नियमन) नियम, 2011, नियम 6 आहे तो तसाच असेल फक्त रक्कम एक लाखांऐवजी १० लाख आणि कालावधी “तीस दिवस” ऐवजी “तीन महिने” हे बदल करण्यात आले आहेत.