रेल्वे तिकिट दरात  75 टक्क्यांपर्यंत सूट, प्रवाशांना 'या' पद्धतीने घेता येणार फायदा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रशासनाने 1 सप्टेंबर पासून तिकिट दर वाढ केली आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकिट खरेदी करण्याठी सुद्धा आता अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहेत. जर तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणार असल्यास त्या संबंधित तिकिट दरात सूट मिळवण्यासाठी ही बातमी तुमच्या नक्कीच उपगोयी येणार आहे.

खरतर भारतीय रेल्वेत विद्यार्थी, शेतकरी, गरिब, रुग्ण, डॉक्टर, खेळाडू, पत्रकार, सरकारी नोकरी, दिव्यांग आणि वृद्धांसह अन्य प्रवाशांना 25 ते 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते. त्याचसोबत दिव्यांग आणि रुग्णांसोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला तिकिटात सूट देण्यात येते.(रेल्वेच्या इ-तिकिटांवरील शुल्कात वाढ केल्यानंतर आता राजधानी एक्सप्रेसमधील खाणं महागणार)

रेल्वे तिकिटात स्लीपर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेयर, आणि एसी सेकेंड क्लास पर्यंत ही सूट प्रवाशांना देण्यात येते. त्यामुळे जर तुम्हाला या बाबत अधिक फायदा करुन घ्यायचा असल्यास त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. त्यानंतरच तुम्हाला तिकिट दरात सूट दिली जाते.जर एखाद्या रुग्णाला तिकिट दरात सूट हवी असल्यास त्याला डॉक्टरांकडून त्यासंबंधित प्रमाणपत्र बनवणे आवश्यक आहे. तर जाणून घ्या कोणत्या नागरिकांना आणि किती टक्क्यांपर्यंत तिकिट दरात सूट देण्यात येते.

>>पुढील नागरिकांना 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते:

-दिव्यांग

-मानसिक रुग्ण

-कॅन्सरग्रस्त

-थॅलेसेमीया रुग्ण

-हृदयविकाराचे आजार असलेले रुग्ण

-किडनी ट्रान्सप्लाट/ डायलसिस रुग्ण

-हेमोफिलिया रोगी

-टीबी रुग्ण

-कोड रुग्ण

>>पुढील नागरिकांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते:

-ओस्टॉमी रुग्ण

-58 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयातील महिला

-60 वर्षावरील पुरुष मंडळी

-अभ्यासक्रमासाठी जाणारे ओबीसी किंवा जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी

-मुकबधिर व्यक्ती

तर वरील व्यक्तींना रेल्वे तिकिटात सूट देण्यात येते. तसेच नागरिकांना तिकिट दर किंवा रेल्वे वेळापत्रकाबाबत अधिक माहिती रेल्वे स्थानकात उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करत असल्यास विनातिकिटाशिवाय प्रवास केल्यास दंड भरावा लागतो.