Coronavirus Update India:  भारतामध्ये 24 तासांत  61,408 नव्या कोविड रूग्णांची भर तर 57,542 जणांची आजारावर यशस्वी मात
Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 31,06,349 पर्यंत पोहचला आहे. भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 61,408 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 836 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आत्तापर्यंत 23,38,036 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर पूर्ण मात केली आहे. तर 57,542 जणांची कोरोना विरूद्धची लढाई यशस्वी ठरल्याने निधन झाले आहे. दरम्यान भारतामध्ये 24 तासांमध्ये 57,468 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणं या पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतामध्ये दिवसागणिक कोरोना रूग्ण वाढत असले तरीही मृत्यूदर कमी आहे आणि ही दिलासादायक बाब आहे. 17-23 ऑगस्ट या आठवड्यभरामध्ये देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची आणि कोविड 19 मुळे मृत्यूंची नोंद झाली आहे.

ANI Tweet

भारतासमोर असलेलं कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी देशात 3 लसींवर विविध टप्प्यामध्ये काम सुरू आहे. यामध्ये सीरम इन्सिट्युट, आयसीएमआर आणि भारत बायोटेक, झायडस कॅडिला यांच्या लसींचा समावेश आहे.