NITI Aayog CEO B V R Subrahmanyam | X @ANI

भारताची अर्थव्यवस्था आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. जपानला मागे टाकत आता भारताने आघाडी घेतल्याचं NITI Aayog CEO B V R Subrahmanyam यांनी जाहीर केलं आहे. नीति आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर माहिती देताना सुब्रमण्यम म्हणाले की, एकूणच भू-राजकीय आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे. "भारत आता चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे.आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची आहे," असे ते म्हणाले. आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला देत सुब्रमण्यम म्हणाले की, आज भारत जपानपेक्षा मोठा आहे. "फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहे आणि जर आपण जे नियोजन केले आहे आणि जे विचारात घेतले जात आहे त्यावर टिकून राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू," असे सुब्रमण्यम म्हणाले.

अमेरिकेत विकले जाणारे अ‍ॅपल आयफोन भारतात किंवा इतरत्र नव्हे तर अमेरिकेतच तयार केले जातील अशी अपेक्षा आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच केलेल्या विधानाबाबत विचारले असता, सुब्रमण्यम म्हणाले, "शुल्क किती असेल हे अनिश्चित आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आम्ही उत्पादनासाठी स्वस्त जागा असू."

10th NITI Aayog Governing Council Meeting मध्ये घोषणा

सुब्रमण्यम यांनी असेही सांगितले की Asset Monetisation Pipeline दुसरा टप्पा तयार केला जात आहे आणि ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केली जाईल.