देशातील आर्थिक मंदीच्या कारणामुळे IMF ची भारताला चेतावणी, लवकरच मोठे पाऊल उचलण्याची शक्यता
IMF (Photo Credits-Twitter)

भारताच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला असून देशातील विविध क्षेत्रातील कंपन्यांवर याचा परिणाम झाला आहे. मात्र आर्थिक मंदी मधून बाहेर येण्यासाठी IMF (International Monetary Fund) लवकरच मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. आयएमएफ यांचे असे म्हणणे आहे की, भारतीय अर्थव्यवस्था, ग्लोबल इकोनॉमिक्स ग्रोथ वाढवण्याची एक अर्थव्यवस्थेमधील एक असून भारताला वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. आयएमएफ यांनी त्यांच्या वर्षभरातील समीक्षेत असे म्हटले आहे की, गुंतवणूकीत घट आणि खप, कर महसूल यामध्ये सुद्धा या वर्षात बरीच कपात झाली आहे. याचा फटका आर्थिक वाढीला बसला आहे.

आयएमएफ एशिया आणि पेसिफिक डिपार्टमेंटचे असे म्हणणे आहे की, कोट्यवधी लोकांना गरीबीतून बाहेर काढल्यानंतर भारत आता आर्थिक मंदीच्या स्थितीत आहे. सध्याची मंदी दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासाच्या मार्गावर परत जाण्यासाठी भारताला तातडीने आर्थिक उपाययोजनांची आवश्यकता आहे. तथापि, विकासावर खर्च करून यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडे मर्यादित पर्याय आहेत.(1 जानेवारी 2020 मध्ये होणार मोठे बदल, महागणार 'या' वस्तू)

 आयएमएफचे चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ म्हणाल्या की, आर्थिक वर्ष 2019-20 च्या डिसेंबर आणि मार्चच्या तिमाहीतही आर्थिक वाढ कमकुवत राहील. यापूर्वी आम्हाला चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन तिमाहींमध्ये तेजीची अपेक्षा होती. परंतु आता पुनर्प्राप्ती करणे कठीण झाले आहे. ते म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला जुन्या अंदाजात बदल करावा लागेल. आयएमएफ 20 जानेवारी 2020 रोजी भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनाचा अहवाल जाहीर करणार आहे.