भारतात आजपर्यंत 4 कोटींहून अधिक COVID19 च्या चाचण्या पार पडल्याची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती
Coronavirus (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्णांची वाढ होत आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनाच्या लस संबंधित अभ्यास करत आहेत. तर जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत अद्याप कोरोनाची भारतातील परिस्थिती तितकीशी गंभीर नाही आहे. कारण देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून प्रत्येक मार्गाने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता भारतात (India) आजपर्यंत 4 कोटींहून अधिक कोरोनाच्या चाचण्या पार पडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये कोरोनाची जरी लक्षणे आढळून आली तरीही त्यांनी त्यासंबंधित चाचणी करावी असे आवाहन वारंवार करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जेवढ्या चाचण्या अधिक होतील त्यानुसार कोरोनाच्या परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल असे ही सांगण्यात आले आहे. ऐवढेच नाहीतर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी नव्या टेस्टिंग लॅब सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 4,04,06,609 कोरोनाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.(Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 34 कोटींचा टप्पा; 76,472 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह 1,021 मृत्यू)

दरम्यान, देशात कोरोनाच्या परिस्थितीसोबत नागरिकांनी जगण्यास शिकायला हवे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती कधी संपेल यावरील अद्याप ठोस उत्तर कोणालाच ठाऊक नाही. परंतु नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोरोनाच्या काळात नागरिकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करु नये याबद्दल सांगितले होते. तर येत्या 30 ऑगस्टला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.