Lithium | Pixabay.com

भारताच्या खणन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू कश्मीर मध्ये पहिल्यांदाच लिथियम चं भंडार सापडलं आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण माहितीनुसार दिल्लीपासून सुमारे 650 अंतरावर जम्मू कश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 मिलियन टन लिथियम सापडलं आहे. खणन मंत्रालयाच्या माहितीत लिथियम आणि सोनं सह 51 खनिज ब्लॉक सरकार कडे सुपूर्त करण्यात आल्याचंही स्पष्ट केले आहे. या 51 पैकी 5 ब्लॉक सोन्याची संबंधित आहेत.

लिथियम हा असा एक धातू आहे ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीज, मोबाईल बॅटरीज यांच्या निर्मितीसाठी केला जातो. केंद्र सरकार सध्या मेट्रो सीटीज मध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा प्रामुख्याने समावेश करत आहेत. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चैन्नई, कोलकाता या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनं वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.यासाठी लिथियमचं सापडलेलं हे नवं भंडार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सध्या चीन आणि ऑस्ट्रेलिया या लिथयम वर हुकूमत करत आहे. आपल्याला त्यासाठी या दोन्ही देशांवर अवलंबून रहावं लागत आहे. पण आता जम्मू कश्मीरमधील भंडार देशाला नवा पर्याय देऊ शकतो.

रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी 1851 मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये, GSI हे देशातील विविध क्षेत्रातील आवश्यक भू-विज्ञान माहितीच्या भांडारातच वाढले नाही, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भू-वैज्ञानिक संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे.