भारतात दक्षिण-पश्चिम मान्सूनचा पहिला टप्प्याचा अंदाज हवामान विभागाकडून आज जारी करण्यात येणार
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

एप्रिल महिना उजाडून 15 दिवस होऊन गेले आणि उकाडा जाणवायलाही सुरुवात झाली आहे. अशातच लोकांना आतुरता लागते ती पावसाची आणि भारतात पावसाचे आगमन कधी होणार हे सांगणारे भारतीय हवामान खाते याबाबत माहिती देते. दरवर्षी प्रमाणे यंदाही IMD विभाग भारतातील हवामानाची माहिती देणार आहे. हा LRF दोन टप्प्यात विभागला जातो. त्यातील पहिला टप्पा आज दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा माहिती दिली जाणार आहे. LRF मध्ये भारतीय हवामान विभाग दोन टप्प्यात जारी केले जाते.

त्यातील पहिला टप्पा हा एप्रिलमध्ये तर दुसरा टप्पा हा जूनमध्ये सांगितला जाते. हे अंदाज स्टॅटिस्टिकल एन्सेम्बल फोरकास्टिंग सिस्टम (एसईएफएस) आणि डायनेमिकल युग्डेड ओशन-अ‍ॅटमंडॉरिक मॉडेल्सचा वापर करून जारी केले जातात. जे समुद्राच्या परिस्थितीतील पूर्वानुमान घटक आणि एल निनो दक्षिणी ऑसीलेशन (ईएनएसओ) आणि हिंद महासागर डिपोल (आयओडी) ची सद्य स्थिती दर्शवितात. मुंबई मध्ये तापमान 38.1 अंशावर, मागील 10 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील तिसर्‍या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

या संदर्भात आज IMD कडून व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यावर तज्ज्ञ भारतातील पावसाच्या आगमानाबाबत तसेच किती प्रमाणात आणि कशा स्वरुपात पाऊस पडेल याबाबत माहिती दिली जाईल.