IKEA India Apologises: मृत उंदीर छतावरून टेबलवर, आयकिया कंपनीने मागितली माफी
IKEA India Apologises | (Photo credit: twitter)

Dead Mouse Fell Table: फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तूंच्या पुरवठा आणि विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयकिया कंपनीने ग्राहकांची जाहीर माफी मागितली आहे. एक महिला बंगळुरु येथील IKEA च्या फूड कोर्टवर जेवण करत होती. दरम्यान, एक मेलेला उंदीर छतावरुन खाली तिच्या डेबलवर पडला. या घटनेमुळे घाबरलेल्या आणि चिडलेल्या महिला ग्राहकाने सदर प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन तक्रार केली. त्यानंतर कंपनीने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

ट्विटर वापरकर्ता @Sharanyashettyy या घटनेचे धक्कादायक फोटो शेअर आपल्या हँडलवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये या वापरकर्त्याने म्हटले आहे की, आपण बंगळुरु येथे IKEA च्या फूड कोर्टवर जेवण करत होतो तेव्हा एक मेलेला उंदीर टेबलावर पडला. ज्या टेबलवर आपण जेवणाचा अस्वाद घेत होतो. वापरकर्त्याने शेअर केलेल्या टेबलावर काही खाद्यपदार्थ ठेवलेले आणि त्याच्या शेजारी एक मेलेला उंदीर दिसत आहे.

वाचकांच्या माहितीसाठी असे की, IKEA आपल्या ग्राहकांना केवळ फर्निचरच्या विस्तृत श्रेणीतून निवडण्याचा अनुभव देत नाही तर त्याच्याकडे जगभरातील खाद्यपदार्थांची सेवा देणारे फूड कोर्ट आहे. ही धक्कादायक घटना घडली तेव्हा ग्राहक IKEA फूड कोर्टमध्ये जेवणाचा आनंद घेत होती. घडल्या प्रकारबाद्दल सोशल मीडियावर अनेकांनी या आयकिया कंपनीवर प्रश्नांचा भडीमार आणि टिका केली.

दरम्यान, आयकिया कंपीनीने दिलगीरी व्यक्त करत म्हटले आहे की, हेज! IKEA नागासंद्र येथे झालेल्या अप्रिय घटनेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही सध्या घडलेल्या घटनेबाबत तपास करत आहोत. शिवाय खबरदारीचे सर्व प्रयत्न करत आहोत. अन्न सुरक्षा आणि स्वच्छता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे . आमच्या ग्राहकांना IKEA मध्ये नेहमी सर्वोत्तम खरेदीचा अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे.