IIT Baba Abhay Singh (फोटो सौजन्य - ANI)

IIT Baba Abhay Singh Threatens Suicide: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले आयआयटी बाबा अभय सिंह (IIT Baba Abhay Singh) यांच्याविरुद्ध राजधानी जयपूरमध्ये पोलिसांनी (Jaipur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिप्रापथ पोलिस ठाण्याला माहिती मिळाली होती की बाबा रिद्धी-सिद्धी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत आणि तिथे गोंधळ घालत आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जिथे झडती दरम्यान अभय सिंगकडून गांजा जप्त करण्यात आला. तथापि, जप्त केलेल्या गांजाचे प्रमाण खूपच कमी होते, ज्यामुळे तो कमी दर्जाचा गुन्हा मानला गेला. पोलिसांनी बाबांना कडक सूचना देऊन सोडले आणि ते पोलिस ठाण्यात परतले.

पोलिसांच्या कारवाईनंतर अभय सिंगने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे, तर पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. पोलिसांनी अभय सिंगला विचारले असता त्यांनी सांगितले की, 'मी गांजाच्या नशेत होतो. मी काय बोललो ते मला कळत नाही.' (हेही वाचा -IIT Baba Troll After Ind vs Pak Match: टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाच भाकीत ठरल खोट; नेटकऱ्यांनी चांगल सुनावल)

पहा व्हिडिओ - 

अभय सिंगविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाचे वजन 1.50 ग्रॅम होते. गांजाचे प्रमाण कमी असल्याने त्यांना इशारा देऊन सोडून देण्यात आले. सध्या याप्रकरणी अभय सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.