IAF Day 2020 (Photo Credits: Twitter/ANI)

हवाईमार्गे देशावर हल्ले करणा-या शत्रूला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीय वायुसेनेच्या वीर योद्धांचा सन्मान करण्याचा आज दिवस. 8 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभरात भारतीय वायुसेना दिन (Indian Air Force Day 88th Anniversary) साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गाजियाबाद येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी हिंडन एअरबेस येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat), सेना प्रमुख, जनरल मनोज मुकुंद नारावणे (Manoj Naravane) आणि नॅशनल स्टाफ चीफ अ‍ॅडमिरल करंबीर सिंह (Karambir Singh) उपस्थित होते. तसेच IAF चे मुख्य वायुसेना प्रमुख मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी विशेष कार्यक्रमाची आणि परेडची विशेष पाहणी केली. स्कॉड्रॉन लीडर शिवांगी राजावत या महिलेने निशान टोली  एअरफोर्स स्टेशनवर काढण्यात आलेल्या मार्चचे नेतृत्व केले.

भारतीय वायुसेनेच्या या अद्भूत सोहळ्यात हेलिकॉप्टरमधून आकाशात भारताचा तिरंगा झेंडा फडकावत सर्वांनी त्याला सलामी दिली. तसेच येथे वायुसेना दलाचे विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते.

पाहा फोटोज:

हेदेखील वाचा- Indian Air Force Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह या दिग्ग्ज नेत्यांना ट्विटद्वारे हवाई दलाच्या योद्धांना दिल्या 88 व्या भारतीय वायु सेना दिनाच्या शुभेच्छा

डोळ्यांचे पारणं फेडणा-या या कार्यक्रमात वायुसेनेच्या वीर योद्धांना गौरविण्यात आले.

भारतीय वायु सेना जगातील सर्वात मोठी वायुसेनांपैकी एक असून या यादीत ती चौथ्या स्थानावर आहे. या यादीत अमेरिका, चीन, रुस या देशानंतर भारताकडे ही सर्वात मोठी वायुसेना आहे.