![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/ANI-Tweet-Pune--380x214.jpg)
जगभरात दिवसेंदिवस कोरोना वायरसची दहशत वाढत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इराणमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. आज IAF च्या खास विमानातून सुमारे 58 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. सोमवार, 9 मार्च दिवशी इराणसाठी रवाना झालेले भारतीय हवाईदलाचं C-17 ग्लोबमास्टर विमान आज (10 मार्च) गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर उतरलं आहे. काही वेळापूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून इराण, तेहरान येथील भारतीय भाविकांच्या मदतीसाठी एम्बसीद्वारा प्रयत्न केले जात होते. यामध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्यांचे एक जयशंकर यांनी आभार मानले आहेत. दरम्यान सध्या कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 4000 च्या वर पोहचली आहे. इराणमध्ये अडकलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील काही भाविकांचा समावेश होता. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्रीय प्रशासनाकडे पाठपुरवठा केला जाणार आहे. सध्या इराणमधून आलेले 58 जण 14 दिवसांसाठी एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार सुमारे 1200 भारतीय इराणमध्ये अडकले आहेत. सध्या इराण, तेहरानमध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. या देशात सुमारे 7161 कोरोनाग्रस्त असून त्यापैकी 237 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इराणमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. सध्या भारतामध्ये 47 कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये त्यांच्यावर उपचार आहेत. काही दिवसांपूर्वीच 300 भारतीयांच्या लाळेचे नमुने इराणमधून भारतात आणण्यात आले आहेत. भारतीयांची करोना व्हायरसची तपासणी केंद्रीय आरोग्य मंत्रालय इराणमध्ये करणार होतं. तिथे प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार होती. मात्र, नंतर ही योजना रद्द करण्यात आली. इराण येथे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 194 जणांचा मृत्यू.
ANI Tweet
IAF C-17 Globemaster carrying the first batch of 58 Indian pilgrims, lands at Hindon air force station in Ghaziabad from Tehran, Iran. #CoronaVirus pic.twitter.com/kw5i4lQ2pJ
— ANI (@ANI) March 10, 2020
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 2 रूग्ण आहेत. दुबईहून परतलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या दोघांवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 20-29 फेब्रुवारी दरम्यान हे दाम्पत्य दुबईला गेलं होतं. 1 मार्चला ते पुण्यात परतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघेही सर्दी, ताप, खोकला यामुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर दोघांनाही नायडू रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.