Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारत सरकारकडून जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवत या राज्याचा विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता भारताच्या या निर्णयावरून पाकिस्तानकडून काही कुरघोडी होणयची शक्यता आहे.  गुप्तचर विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्‍यानंतर 'जैश ए मोहम्मद' (Jaish-e-Mohammed)या आतंकवादी संघटनेचे 8-10 आतंकवादी आत्मघाती हल्ला करू शकतात. या पार्श्वभूमीवर भारतातील 30 शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, कानपूर, गांधीनगर, लखनऊसह महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.

TOI च्या वृत्तानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अशा महत्त्वाच्या व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाणावर आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. यासोबतच जम्मू कश्मीर मधील हवाई दलाचे तळ देखील अतिरेक्यांच्या रडारवर असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. विदेशी गुप्तचर यंत्रणांना जैशच्या पाकिस्तानी आतंकवादी शमशेर वाणी आणि जैश सरगना यांच्यामधील संभाषण मिळाले आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासूनच भारतामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची आखणी केली जात असल्याचे

टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्त आहे.

ANI Tweet

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. '500 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या जवानांना ठाऊक आहे. त्यासाठी सेनेचे जवान अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल' अशी माहिती रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.