Hyderabad Rape And Murder Case: नातेवाईकांनी 100 नंबरवर फोन लावता पोलीस म्हणाले 'पहिले आधार कार्ड क्रमांक सांगा'
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

हैदराबाद येथील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निर्घृण हत्या (Hyderabad Gangrape Murder Case)यामुळे देशभरात संतप्त वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आणि संसदेतही (Parliament) आवाज उठवला जात आहे. या दरम्यान, एका खासगी वृत्तवाहीणीने देलेल्या वृत्ताने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसी मदत घेण्यासाठी 100 क्रमांक डायल केला असता, मदत मागणाऱ्या व्यक्तिला आगोदर आधार कार्ड विचारण्यात आला.

एका खासगी वृत्तवाहिणीचा हवाला देत न्यूज 18 ने दिलेल्या वत्तात म्हटले आहे की, पीडितेचा मृतदेह मिळाल्यानंतर तिची बहिण पोलिसांकडे गेली. त्या वेळी पोलिसांनी सांगितले की, तुझ्या बहिणीने जर 100 क्रमांकावर फोन करुन संपर्क साधला असता तर, कदाचित तिचे प्राण वाचले असते. पीडितेच्या बहिणीने सांगितले की, अनेकदा कसून शोध घेऊनही बहिण सापडली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी 100 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला मात्र पोलिसांनी पहिल्यांदा घटनास्थळ आणि मदत याबाबत विचारणा करण्याऐवजी पहिल्यांदा आधार कार्ड क्रमांक विचारला त्यानंतरच तक्रार नोंदवली. (हेही वाचा, Hyderabad Rape And Murder Case: सौदी अरेबिया, चीन यांसारख्या या '10' देशांमध्ये अशा पद्धतीने दिली जाते बलात्कारी व्यक्तीस शिक्षा)

पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, पोलिसांकडे आम्ही जेव्हा सुरुवातीला संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी आम्हाला असेही ऐकवले की, तुमची मुलगी कोणासोबत फिरायला गेली असावी. पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, आम्ही पोलिसांना पीडितेसोबत झालेल्या संवादाचे फोन रेकॉर्डिंगही ऐकवले. परंतू, त्यांनी मानले नाही. अखेर बऱ्याच वेळानंतर त्यांनी आमची तक्रार घेतली.