How To Vote #India Google Doodle: 5 व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान कसे करावे #भारत खास गूगल डुडल
How To Vote #India? (Photo Credits- Google)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या आजच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त गूगलने (Google) खास डूडल बनवले आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या आजच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला (5 th Phase Voting) सुरूवात झाली आहे. यानिमित्त गूगलने खास How To Vote #India डूडल बनवले आहे. आज 7 राज्यांमध्ये 51 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi), स्मृती इराणी (Smriti Irani) यासारखे दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

गुगलने खास डुडल साकारले आहे. मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवून मतदानाची संपूर्ण प्रक्रीया समजावून सांगण्यात आली आहे. गुगलने डुडल साकारुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मतदान करण्याची प्रक्रीयाही समजावून सांगितली आहे.

उत्तर प्रदेश मध्ये14 , राजस्थान मध्ये12 , पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश मध्ये सात-सात जागांवर मतदान होईल. तर बिहारमध्ये पाच आणि झारखंडमध्ये चार जागांवर मतदान होणार आहे. जम्मू-कश्मीर मधील लडाख आणि अनंतनाग मधील पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात मतदान होईल.

मतदानाचा चौथा टप्पा आज पार पडणार आहे. तर मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.