Mobile Lab for COVID-19 Testing (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या देशात दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. तसंच कोविड-19 च्या चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. त्यात अजून भर घालण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. कोविड-19 च्या चाचणीसाठी भारतातील पहिली मोबाईल लॅब (Mobile Lab) सुरु करण्यात आली आहे. याचे आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ही मोबाईल लॅब देशातील दुर्गम भागात तैनात करण्यात येणार आहे. दिवसाला 25 RT-PCR टेस्ट करण्याची या मोबाईल लॅबची क्षमता आहे. त्याचबरोबर TB, HIV च्या टेस्ट देखील Central Government Health Scheme च्या दरानुसार करण्यात येतील.

"कोविड-19 च्या संकटाचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडे केवळ 1 लॅब होती. आज देशभरात आपल्याकडे 953 लॅब्स आहेत. यापैकी 699 सरकारी लॅब्स आहेत. मात्र दुर्गम भागात टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अशा प्रकारच्या मोबाईल लॅबची गरज आहे," असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. (मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने लॉन्च केले रोबोटिक डिव्हाईस 'Captain Arjun'; कोविड-19 च्या काळात थर्मल स्क्रिनिंगसह मिळणार 'या' सुविधा, Watch Video)

ANI Tweet:

सोमवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, "वेळेत लॉकडाऊन केल्याने भारतात कोविड-19 बाधितांची संख्या झपाट्याने वाढली नाही. तसंच कोरोनावर मात करण्यासाठी सरकार उपाययोजनांच्या अंमलबजावणीसह आवश्यक खबरदारी घेत आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या चाचण्यांचे दरही कमी करण्यात आले आहेत."