Arrested

हरियाणा (Haryana) राज्यातील करनाल पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चार जणांना अटककेली आहे. पंजाबचे रहिवासी असलेले हे चारही जण खालिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) असल्याचा संशय आहे. हे चौघेही आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संबंधितअसल्याचाही संशय आहे. या चौघांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि RDX जप्त करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास बसताडा टोल नाक्यावरुन या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे चौघे जन इनोवा कारमधून दिल्लीच्या दिशेने निघाले होते. गुरप्रीत, भूपेंद्र अमनदीप आणि परविंदर सिंह अशी या चौघांची नावे असल्याचे समजते.

पोलिसांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे चारही जण पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हरविंदर सिंह याचे सहकारी आहेत. करनाल पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. पकडलेल्या संशयीत दहशतवाद्यांबद्दल करनालच्या एसपींनी सांगितले की, दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा यांने यांना आदेश दिले होते. सांगितले जाते आहे की, चौघेही संशयित तेलंगणाला IED पाठवणार होते. त्यांना पोकिस्तानातून ठिकाण पाठविण्यात आले होते. त्यापूर्वी या चौघांनी दोन ठिकाणी IED पाठवले आहे.

अटक करण्यात आलेल्या चौघांकडून 31 काडतूस, 3 लोखंडी कंटेनर जप्त करण्यात आली आहेत. सोबतच 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली आहे. चौघांपैकी तिघेजण हे फिरोजपूर येथील राहणारे आहेत तर 1 जण लुधियानाचा राहणारा आहे. प्रमुख आरोपीची कारागृहामध्ये एकमेकांसोबत ओळख झाली होती.