File image of Patidar quota agitation leader Hardik Patel | (Photo Credits: PTI)

कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांच्यावर देशद्रोहाचा (Sedition) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हार्दिकची पत्नी किंजल पटेल यांनी, 18 जानेवारीपासून आपला नवरा हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी ही माहिती दिली. हार्दिक पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Arrest Warrant) जारी करण्यात आले आहे.

आरक्षण आंदोलनादरम्यान पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यांविरूद्ध, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टात जेव्हा जेव्हा तारीख असते तेव्हा ते व्यस्त असल्याचे निमित्त सांगून, कोर्टात गैरहजर राहिले आहेत. अशा प्रकरणात कोर्टाने हार्दिकविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

किंजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिस हार्दिकचा शोध घेत आहेत, त्यामुळे त्यांनी कुटुंबातील कोणाशीही कसलाच संपर्क साधला नाही. किंजल पटेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, हार्दिकला पोलिसांना पकडले आहे का? तो कुठे आहे याची मला कल्पना नाही. किंजल यांनी हार्दिकच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हार्दिक सध्या 20 हून अधिक खटल्यांचा सामना करीत आहेत, त्यातील 2 प्रकाराने देशद्रोहाशी संबंधित आहेत. (हेही वाचा: काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक)

कोर्टाने पुन्हा एकदा हार्दिकविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी हार्दिकला जामीन मिळाल्यावर त्यांना प्रत्येक ठरलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतरही हार्दिक कोर्टात पोहोचले नाहीत. अखेर कोर्टाने त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले. अशा परिस्थितीत पोलिस हार्दिकचा शोधही घेत आहेत, पण अजूनही त्यांच्या हाताला यश आले नाही. पटेल यांच्या परिवाराने केलेल्या दाव्यानुसार, हार्दिकच्या अखेरच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही.