
गुजरातमधील (Gujarat) बनासकांठा जिल्ह्यात बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्या नग्न व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत, सात जणांनी जवळपास 16 महिने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बुधवारी याची माहिती दिली. माहितीनुसार, 2023 मध्ये या मुलीने पालनपूरमधील एका महाविद्यालयात जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली. नोव्हेंबर 2023 मध्ये, त्याने तिला एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी येण्यास भाग पाडले. एफआयआरनुसार, त्याने जाणूनबुजून तिच्या ड्रेसवर अन्न सांडले आणि कपडे स्वच्छ करण्याच्या बहाण्याने तिला एका खोलीत नेले.
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा विद्यार्थिनीने बाथरूममध्ये तिचे कपडे काढले तेव्हा विशाल चौधरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने आत घुसून तिचे व्हिडिओ काढले. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने व्हिडिओ सार्वजनिक करून इंस्टाग्रामवर पोस्ट करण्याची धमकी दिली. याच क्लिपचा वापर करून, त्याने नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केले. यासह त्याने त्याच्या मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासही तिला भाग पाडले. (हेही वाचा: Mumbai Shocker: मशिदीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; आरोपी 80 वर्षीय वृद्धाला अटक)
अखेर मुलीने पालनपूर तालुका पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, भारतीय न्याय संहितेवर वारंवार बलात्कार आणि गुन्हेगारी धमकी देण्याच्या कलमांखाली सहा ओळख पटलेल्या आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्रीचे प्रकाशन किंवा प्रसारण करण्याबाबत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गतही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालनपूर तालुका पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.