प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

Gujarat: पाकिस्तानी नौसेने द्वारे आज एका भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या मरीन कमांडोंनी 6 मच्छिमारांचे सुद्धा अपहरण केले आहे. ही घटना अशावेळी घडली जेव्हा गुजरात मध्ये द्वारकाच्या जवळ ओखाच्या येथे भारतीय मच्छिमारांना भारतीय समुद्री परिसरात मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी पाकिस्तानी मरीन कमांडोची बोट येथून निघाली आणि त्यांनी भारतीय बोट 'जलपरी' यावर गोळीबार केला.

या बोटीत मच्छीमार सुद्धा होते आणि त्यामधील एकाचा मृत्यू झाला. तर 6 मच्छिमारांचे अपहरण मरीन कमांडोंनी केले आहे. सध्या या प्रकरणी तपास नेवी आणि कोस्ट व्यतिरिक्त सुरक्षा यंत्रणेकडून केली जात आहे. अपहरण करण्यात आलेल्या मच्छिमारांना कोठे नेण्यात आले याबद्दल ही काही कळलेले नाही.(Pakistan च्या विजयाचा आनंद साजरा करणे पडले महागात, संतापलेल्या नवऱ्याने बायकोच्या विरोधात दाखल केला FIR)

Tweet:

दरम्यान, याच वर्षात मार्च मध्ये पाकिस्तानने 11 भारतीय मच्छिमारांना पकडले होते. पाकिस्तानने आरोप लावला होता की, हे मच्छिमार त्यांच्या जलक्षेत्रात घुसले आहेत. खरंतर अरबी समुद्राच्या सीमेची कोणताही रेषा नाही आहे. यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या मच्छिमारांना ताब्यात घेतात. काही वेळा मच्छिमारांना कोणतेही कारण नसल्याशिवाय ही तुरुंगात रहावे लागते.