Garba in PPE Kits (Photo Credits: ANI)

अगदी उद्यावर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर येते गरबा, दांडियाची धूम. दरवर्षी नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. दांडियासाठी स्पेशल ड्रेस, दागिने खरेदी केली जाते. तर अनेक ठिकाणी भाडे तत्त्वावरही ड्रेस उपलब्ध करुन दिले जातात. मग ग्रुप बनवणे, गरबासाठी पास मिळवणे आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दांडिया एन्जॉय करणे हे गेल्या अनेक नवरात्रोत्सवात आपण केले असेल. परंतु, यंदाचे वर्ष काहीसे वेगळे आहे. यावर्षी नवरात्रोत्सवावर कोविड-19 संकटाचे सावट आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र गरबा, दांडिया रद्द करण्यात आला आहे. तसंच नवरात्रोत्सवही अगदी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, दरवर्षीच्या गरबा, दांडिया खेळण्याच्या परंपरेत खंड पडू नये म्हणून गुजरात मधील फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

गरबा हा गुजरातचा नृत्यप्रकार. त्यामुळे तेथील लोकांची गरब्याची आवड, खेळण्याची हौस याला मौल नाही. गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात गरबाचा मोठा उत्साह असतो. कोविड-19 संकटात तोच उत्साह टिकवून ठेवण्यासाठी सुरत मधील एका फॅशन हटके स्टाईलने सुरक्षित कॉच्युम डिझाईन केले आहेत. ते कपडे घालून गरबा खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हे कॉच्युम पीपीई किटपासून बनवण्यात आले असून ते हँड-मेड आहेत. (Navratri 2020 Virtual Celebration Ideas: कोविड-19 संकटात यंदा व्हर्च्युअल माध्यमातून साजरा करा नवरात्रोत्सव; पहा सेलिब्रेशनच्या विविध आयडियाज)

ANI Tweet:

हौसेला मोल नाही! हे या विद्यार्थ्यांकडे पाहून कळते. कोरोना व्हायरस संकटातही सुरक्षितता जपत त्यांनी दाखवलेली क्रिएटीव्हीटी वाखाण्याजोगी आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे संकट कायम असून गुजरातमधील कोरोना बाधितांची संख्या 1,54,936 वर पोहचली असून त्यापैकी 1,36,404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 14,937 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 3,595 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.