Rajiv Kumar, Chief Election Commissioner | (Photo Credits: Twitter/ANI)

भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) आज (गुरुवार, 3 नोव्हेंबर) गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election 2022 Schedule) दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिला टप्पा 1 डिसेंबर तर दुसरा टप्पा 7 डिसेंबर रोजी (Gujarat Assembly Elections Date) पार पडणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश अशा दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी ही माहिती दिली.

1,274 मतनाद केंद्रांवर असणार महिला अधिकारी

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत मतदान केंद्रांवर महिला अधिकाऱ्यांचा समावेश विशेष उल्लेखनिय असेल. त्यासाठी एकूण मतदान केंद्रांपैकी 1,274 महिला मतदान केंद्र आणि सुरक्षा अधिकारी व्यवस्थापित करतील, असे आयोगाने सांगितले. एकूण 182 मतदारसंघासाठी होत असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक 51,782 मतदान केंद्रे स्थापन केली जातील.

घरपोच मतदानाची सुविधा

निवडणूक आयोगाने सांगितले की, 80 वर्षांवरील मतदारांसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. अशा मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाचे एक पथक त्याच्याकडे जातील आणि त्याला अधिकार बजावण्याचा मार्ग उपलब्ध करुन देतील.

ट्विट

विद्यमान 182 सदस्यीय गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी संपत आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत या आधी मुख्यतः दोन पक्षीय लढत झाली आहे. आता मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण आम आदमी पक्ष (आप) ताकदीने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.