Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

प्राप्तिकर विवरणसंदर्भात (Income Tax Return) करदात्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सीबीडीटीने (CBDT) वर्ष 2019-20 साठी आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढविली आहे. सीबीडीटीने याबाबत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की कोविड-19 (Coronavirus) ची परिस्थिती लक्षात घेता करदात्यांना पुढील दोन महिन्यांसाठी दिलासा दिला जात आहे. आता टॅक्स पेयर्स 30 नोव्हेंबर पर्यंत आयटीआर फाइल करू शकतात. आधी याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर रोजी होती. यापूर्वीही आयटीआर दाखल करण्याची तारीख तीन वेळा वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी, आयटीआर आर्थिक वर्ष 2018-19 साठी 31 मार्च 2020 पर्यंत दाखल करण्यात येणार होता. यानंतर त्यासाठी मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर ती 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली नंतर ती 30 सप्टेंबर 2020 करण्यात आली. आता प्राप्तिकर विभागाने ती 30 नोव्हेंबर केली आहे. कोणत्याही आर्थिक वर्षासाठी रिटर्न हा मूल्यांकन वर्षात दाखल केला जातो. आर्थिक वर्ष 2018-19 साठी तो मूल्यांकन वर्ष 2019-20 झाला. कोरोना संकटामुळे लोकांना कर भरण्यासाठी दिलासा दिल्याचे सीबीडीटीचे म्हणणे आहे.

सीबीडीटीने सांगितले की 1 एप्रिल 2020 ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंत 33.54 लाख करदात्यांचे 18,324 कोटी रुपये परत केले गेले. ज्यामध्ये 32,230 कोटी रुपये प्राप्तिकर देय म्हणून आणि 86,094 कोटी रुपये कॉर्पोरेट कर म्हणून रिटर्न केले गेले. सीबीडीटीनुसार 30 नोव्हेंबरनंतर आयटीआर दाखल करणार्‍यांना दंड आकारला जाईल. या अंतिम मुदतीपर्यंत आपण आयकर विवरण भरला नाही तर आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (हेही वाचा: एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स निमयमांमध्ये 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल; घ्या जाणून)

आयकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांसाठी नवीन 26AS फॉर्म जारी केला आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या नवीन फॉर्मसह परतावा भरणे सोपे झाले आहे. आयटीआर दाखल करताना उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांचा उल्लेख करणे आवश्यक आहे,