'या' गावात उघडयावर शौच करणा-या कुटूंबाचे रेशन होणार बंद, ग्रामपंचायतीचा कठोर निर्णय
Defecating (Photo Credits: Wikimedia)

मोदी सरकारचे 'स्वच्छ भारत अभियान' उपक्रमाचे वारे देशभरात पसरले असून प्रत्येक भारतीय जमेल तसा या अभियानात आपला सहभाग दर्शवत आहे. मात्र अजूनही काही भागातील महाभागांना स्वच्छतेचे महत्व म्हणावे तसे कळलेले नाही. अशा महाभागांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ओडिशातील ब्रहामपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, गौतमी या गावात उघडयावर शौच करणा-याला व त्याच्या कुटूंबाला कडक शासन म्हणून त्यांचे रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या देशात उघड्यावर शौचास बसण्यास बंदी घातली असली तरी अजूनही काही भागात लोक या कायद्याचे पालन न करता सर्रासपणे उघड्यावर शौच करण्यास बसतात. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने हा अजब निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून सर्वच गावक-यांना धक्काच बसला. स्वच्छ भारत अभियानासाठी BMC चा नवा फंडा ; स्वच्छ परिसर स्पर्धेत विजेत्या नगरसेवकांना देणार 1 कोटीचा पुरस्कार

ओडिशातील ब्रहामपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने उघड्यावर शौच करण्याचे आरोप असलेल्या 20 कुटूंबाचे रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गौतमी गावात उघडयावर शौचाला बसणा-या ग्रामस्थांची संख्या कमी झाली आहे.

मात्र ग्राम पंचायतीचा हा अजब निर्णय हा बेकायदेशीर आणि मानवतेला धरून नसल्याचा येथील गावक-यांचे म्हणणे आहे. कोणाही नागरिकाला अन्नापासून वंचित ठेवणे हे कायद्याला धरून नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.