Government Banned the Import of AC with Refrigerants: रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्स आयातीवर भारतात बंदी
Air Conditioners (Photo Credits: Pexels)

भारतात रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्सच्या (Air Conditioners With Refrigerants) आयातीवर बंदी घातली आहे. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) भारत सरकारने (Government of India) हा निर्णय घोषित केला. स्वदेशी प्रॉडक्ट्च्या खरेदीवर भर देण्यासाठी आणि अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर मर्यादा आणण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनात विदेश व्यापार महानिदेशालयने (Directorate General of Foreign Trade) म्हटले, "रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्सच्या आयात सुधारीत पॉलिसीमध्ये त्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्सचा समावेश करण्यात आला आहे."

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला. त्यानंतर अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात येत आहे. तसंच स्वदेशी वस्तूंच्या वापराकडे भर दिला जात आहे. सरकारी डेटानुसार, चीन आणि थायलँड मधून भारतात सर्वाधिक एअर कंडिशनर्स आयात केले जातात. या दोन्ही देशातून मिळून एकूण 90% वस्तू आयात केल्या जातात.

ANI Tweet:

जुलै महिन्यात सरकारने मोटार कार्स, बसेस, लॉरीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या न्युमॅटीक टायर्सच्या आयतीवर बंदी घातली आहे. यापूर्वी सरकारने संरक्षण उपकरणे आणि टीव्ही आयातीवर बंदी घातली होती. (आत्मनिर्भर भारत होणार! डिसेंबर 2020 पासुन 'या' 101 संंरक्षण सामग्रींची आयात बंंद - राजनाथ सिंह)

कोविड-19 संकटात संधी शोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत विदेशी वस्तूंची आयात बंद करुन स्वदेशी वस्तूंचा वापर वाढण्याची योजना आहे. त्यासाठी देशातच नव्या संधी तयार करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.