PIRACY केल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या सिनेसृष्टीत कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वीच किंवा चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी ते प्रेक्षकांमध्ये लिक होतात. अशामुळे चित्रपट निर्मात्यांना खूप मोठा फटका बसतो. तसेच सध्या पायरसीचे (PIRACY) प्रमाण वाढले आहे. मात्र या त्रासापासून बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पायरसी करणाऱ्यांना देण्यात आला आहे.

सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 मध्ये घटनादुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पायरसी करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करत तीन वर्षे तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्याचसोबत 10 लाख रुपयांचा भारदस्त दंड ही ठोठावण्यात येणार आहे. याबाबत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यासा केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. (हेही वाचा-Budget 2019: पायरसी विरोधात लढण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, सिनेनिर्मात्यांसाठी सरकारचं खास गिफ्ट)

चित्रपटाच्या संबंधित निर्मात्यांच्या परवानगी शिवाय रेकॉर्डिंग किंवा प्रदर्शित करणे गुन्हा ठरला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पायरसीला आळा बसणार असून असे करणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहेत.