सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rates) आज सलग दुसर्या दिवशी घट नोंदवण्यात आली आहे. एमसीएक्स (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणार्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. सध्या सोनं मागील सहा महिन्यातील निच्चांकी स्तरावर आहे. मागील वर्षी 7 ऑगस्ट 2020 ला सोनं 56,191 रूपयांच्या उच्चंकी स्तरावर होतं. आता ते दहा हजारांनी घसरलं आहे.
दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये MCX वर आज सोनं ऑक्टोबर वायदा 46180 रूपये पर्ति 10 ग्राम जवळ आहे. तर चांदी डिसेंबर वायदा 0.13 % घसरणी सह 59530 रूपये प्रति किलो आहे. हेदेखील वाचा- Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे.
सोन्या-चांदीचे आज ओपनिंग रेट्स
#Gold and #Silver Opening #Rates for 21/09/2021#IBJA pic.twitter.com/VNf6Ivso9Y
— IBJA (@IBJA1919) September 21, 2021
गुडरिटर्न वेबसाईटनुसार,आज (21 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत 10 ग्रॅम सोन्यासाठी 49,570 रुपये आहे. तर मुंबईत 46,120 रुपये, चेन्नईमध्ये 47,550 आणि कोलकातामध्ये 48,240 रुपये आहे. तर चांदी प्रतिकिलो 59,600 रूपये आहे.
तुम्हांला सोन्या चांदीचे दर पहायचे असतील तर घसबसल्या ते पाहण्यासाठी खास सोय आहे. तुम्हांला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन मेसेजच्या स्वरूपात सोन्या-चांदीचे दर समजू शकणार आहेत.