जागतिक बाजारात मंदीच्या वातावरणात मागील काही दिवसांपासून सोने- चांदी (Gold Silver Rate Today) या धातूंच्या भावात सलग घसरण दिसून येत होती. काल 17 मार्च रोजी प्रति 10 ग्राम सोन्याच्या मागे 39 हजार 661 रुपये इतका भाव होता. तर दहा दिवसात तब्बल 500 रुपयांची घसरण झाल्याने सोने बाजारात चिंतेचे वातावरण होते, मात्र आज 18 मार्च रोजी ही परिस्थिती किंचित सुधारली आहे. सोन्याचे भाव काही अंशी वधारले असून आज मुंबई (Mumbai) , दिल्ली (Delhi) सह देशातील प्रमुख शहरात सोन्याने 40 हजाराचा टप्पा पार केला आहे. आज मुंबई मधील सोन्याचा (२४ कॅरेट) दर प्रति 10 ग्राम साठी 40,210 रुपये , तर 22 कॅरेट साठी 10 ग्राम सोने 39,210 रुपये इतका आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र अद्याप वाढ झालेली नाही, प्रति किलो चांदीच्या मागे 41 हजार 780 रुपये इतका दर आज पाहायला मिळतोय.Coronavirus मुळे भारताच्या विकास दरात होणार 'इतकी' घसरण; S & P Global कंपनीचा अंदाज.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायात मोठा तोटा झाला आहे साहजिकच अनेकांनी गुंतवणुकीचा पर्याय म्ह्णून सोने आणि चांदीला पसंती दर्शवली आहे, मात्र मागील काही काळात गुंतवणूक सुद्धा सतत कमी अधिक प्रमाणात होत असल्याने किमतीत देखील चढउतार पाहायला मिळतोय. हीच परिस्थिती पेट्रोल डिझेलच्या बाबतही काही दिवस आधी पाहायला मिळाली होती, सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेल युद्धामुळे जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे भाव उतरताना आढळून आले होते. क्रूड ऑईलचा किमती मात्र यावेळी सर्वाधिक स्तरावर आहेत.
दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारात सुद्धा दिलासादायक आकडे पाहायला मिळाले आहेत. सकाळी सेन्सेक्स 522.68 अंकांनी वधारून 31,101.77 वर होता तर निफ्टी देखील 150.45 अंकांनी वधारून 9,117.50 वर पोहचला आहे.