 
                                                                 कोरोना व्हायरस संकट काळामध्ये जगभरातील अर्थव्यवस्था गडगडल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांमध्ये कोरोना व्हायरस वॅक्सिनबाबत सकारत्मक बातम्या समोर येत असल्याने आता शेअर बाजारात पुन्हा उलाढाल सुरू झाली आहे. काल सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तारावर 5% झाली आहे. आज सोन्याचा दर 52410 रूपये प्रति 10 ग्राम इतका नोंदवण्यात आला आहे. काल हा दर 52400 इतका होता. दरम्यान या आठवड्यातील सरासरी सोन्याच्या दराच्या तुलनेत सोन्याच्या भावामध्ये घसरण पहायला मिळत आहे.
दरम्यान जगाचा गोल्ड स्पॉट ग्रोथ रेट 1.12% आहे म्हणजेच किंमत अंदाजे $1935.9 इतकी आहे. त्याच्या तुलनेत भारतात हा वाढीचा दर 0.02% नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याचा दर भारतामध्ये 52410 इतका पोहचला आहे.
MCX मध्ये भारतातील gold futures prices मध्ये 0.06% वाढ झाली असून तो 52544 प्रति 10 ग्राम इतका पोहचला आहे. मागील सेशनमध्ये सोन्याच्या दरात 0.71% वाढ झाली होती त्यामुळे सुमारे 31.53 रूपये प्रति 10 ग्राम सोन्याचे दर वाढले होते. सोन्या सोबतच चांदीचे दर देखील वाढले आहे. चांदीमध्ये 0.28% म्हणजे Rs. 187.79 प्रति किलो दर वाढले आहेत. त्यामुळे भारतामध्ये चांदीचे दर 67069 प्रति किलो इतका पोहचला आहे. त्यामुळे आज मुंबई मधील सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 52,410 रूपये इतका आहे. कोलकत्ता मध्ये Rs 53,460 दिल्ली 54510 रूपये मध्ये आणि चैन्नईमध्ये 54 690 रूपये प्रति तोळा आहे.
दरम्यान डॉलर ते रूपये यांच्या कन्व्हर्जन मध्ये कालपासून बदल झालेला नाही. आज सोन्याच्या दरामध्ये झालेला बदल याचा डॉलरच्या व्हॅल्यूवर बदल होण्याशी थेट संबंध नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
