Gold Rate Today: सोन्याचे दर आज MCX वर वधारले; पहा आजचा सोन्या, चांदीचा दर काय?
Gold Rate (photo Credits: PTI)

सोन्या-चांदीच्या दरामध्ये मागील काही दिवसात घसरण झाल्यानंतर आज पुन्हा उसळी पहायला मिळाली आहे. आज(10 ऑगस्ट) मंग़ळावारी, MCX वरील ऑक्टोबर वायदा सोने 170 रुपयांनी वाढून 46,056 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. पण दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी सोन्याचा दर 10 ग्राम साठी 1000 रूपये तर सोमवारी आठवड्याच्या सुरूवातीलाच 700 रूपयांनी घसरला होता. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत 1,730.47 डॉलर प्रति औंस होती. डॉलर निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर होता, ज्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत सोने अधिक महागलेले आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.37 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करत आहे. तर सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीमध्ये प्रति किलो 0.84 टक्के वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत चांदी देखील प्रति किलो 2000 आणि 2250 रूपयांनी कमी झालेलं पहायला मिळालं आहे.

सोन्याप्रमाणे आज चांदीचे दर देखील वाधारले आहेत. MCX वर सप्टेंबर वायदा चांदीची किंमत 525 रुपयांनी वाढून 63,162 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 23.43 डॉलर प्रति औंस होती. मागील सत्रात चांदीची किंमत 8 महिन्यांच्या नीचांक्की किंमतीवर नोंदवण्यात आली आहे.

सध्या सोनं खरेदी साठी ऑगस्ट महिन्यात सोव्हरेन गोल्ड बॉन्ड सिरीज देखील सुरू आहे. ही पाचवी सीरीज आहे. यामध्ये 13 ऑगस्ट पर्यंत तुम्ही सरकार कडून सॉव्हरेन बॉन्ड अंतर्गत प्रतिग्राम 4790 रूपये या दराने सोनं खरेदी करू शकता.