Gold Rate Today in Mumbai, Pune: महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरसचं संकट घोंंघावत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात पडझड पहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांमध्ये 45 हजारांच्या आसपास पोहचलेला हा आकडा आता आज 40 हजारांच्या आसपास पोहचला आहे. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 41,611 रूपये प्रतितोळा इतका आहे. तर चांदीचा दर 35,888 रूपये प्रतिकिलो इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्य दरामध्ये थोडी वाढ झालेली पहायला मिळाली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर आता सराफ बाराज बंद ठेवण्याचा निर्णय राज्यभरात घेतला आहे. मात्र काही सोने-चांदी व्यापरांनी ऑनलाईन मध्यमातून खरेदीचा पर्याय सुरू ठेवला आहे. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्यासाठी तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी ही सोनं खरेदीची उत्तम संधी असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान कोरोना व्हायरस दहशतीमुळे आता मुंबई शेअर बाजरात मोठी पडझड पहायला मिळाली आहे. यामध्ये सेनेक्स, निफ्टीत होणारी गडगड पाहता अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर उतरत आहेत. भारतामध्ये आज चांदीचा दर प्रति किलो 35,888 रूपये इतका आहे.
पहा मुंबई, पुणे सह राज्यातील प्रमुख शहरातील सोन्याचा दर काय?
मुंबई - 41,611
पुणे- 41,641
नाशिक- 41,628
नागपूर - 41,645
सोलापूर - 41,640
(वरील दर प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा goldpriceindia.com नुसार देण्यात आला आहे. )
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसचा धोका वाढत आहे. दरम्यान सध्या हा आकडा 63 वर पोहचला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 258 वर पोहचली आहे. यापार्श्वभूमीवर आता 22 मार्च दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.