जागतिक बाराजपेठेतील चढउताराचे पडसाद राजधानी दिल्लीतील सराफा बाजारातही सोमवारी (11 फेब्रुवारी) उमटले. सोमवारी सेने दर (Gold Prices) 55 रुपयांची घट होऊ ते 34,225 रुपये प्रतिग्राम इतक्या दरावर स्थिर राहिले. अखिल भारतीय सराफा संघाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक युनिट्स आणि नाण्यांची मागणी घटल्यामुळे चांदी दरावरही (Silver Price)मोठा परिणाम झाला. चांदी दर 150 रुपयांनी घररुन ते 41,100 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतीक बाजारपेठेत सोने, चांदी दरात झालेल्या बदलांचे पडसाद स्थानिक बाजारपेठेत उमटले.
जागतिक बाजारातही सोने घसरले
दरम्यान, विदेशी बाजारातही सोने, चांदी दर घरल्याचे पाहायला मिळाले. प्राप्त माहितीनुसार, न्यूयॉर्कमध्ये सोने दर 0.24 टक्क्यांनी घसरुन ते 1,312 डॉलर प्रती औंस तर, चांदी 0.51 प्रति औंस घट होऊन ती 15.82 डॉलर प्रति औंस वर स्थिरावली. दिल्ली सराफा बाजारात सोने 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता 55-55 रुपयांनी घसरुण अनुक्रमे 34,225 रुपये आणि प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले. (हेही वाचा, तुमचे PAN card सांगेल, तुम्हाला Income Tax विभागाची नोटीस येणार की नाही?)
चांदीही झाली स्वस्त
सोने दरासोबतच चांदी दरातही मोठी घसरण झाली. चांदी दर 150 रुपयांनी 41,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले.