![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/aa-Cover-2gq2upukuk2bejb3b045q50is0-20161210012839-784x441-380x214.png)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती बिघडल्याने गुरुवारी संध्याकाळी कॅंडोलिम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली असून मात्र आता त्यांच्या प्रकृतीविषयीही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि भाजपा आमदार मायकल लोबो यांनी रुग्णालयात जावून पर्रिकरांची भेट घेतली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे अलिकडेच म्हणजे ६ सप्टेंबरला अमेरिकेतून उपचार घेऊन भारतात परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तसंच वर्षाच्या सुरुवातीचे तीन महिने देखील ते अमेरिकेत उपाचर घेत होते. सप्टेंबरमध्ये भारतात परतल्यानंतरही ते सरकारी बैठकीत सहभागी झाले नाहीत. घरातूनच ते काम पाहत होते, अशी माहिती समोर आली होती. आता पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.