
मुलगा हव्या असल्याच्या हव्यासापोटी एका कलयुगी बापाकडून फार मोठे पाप घडले आहे. या बापाने आपल्या पोटाच्या लेकीला बंदी बनवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्याला मुलगी झाली या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील ही घटना आहे. शनिवारी रात्री वडिलांनीया मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर पिडीताने पोलिसांना फोन करून या गोष्टीची माहिती दिली. ही घटना घडल्याच्या दिवसापासून आरोपी म्हणजेच या मुलीचे वडील फरार आहे. घडलेल्या घटनेबाबत ही मुलगी इतकी घाबरली आहे की तिला आता परत त्या घरात पाय ठेवायचा नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यापासूनच मुलगी झाल्याचा राग या पित्याच्या मनात होता. गेल्या एक वर्षापासून या मुलीबाबत वडिलांचा हेतू वाईट होता. या दरम्यान या कलयुगी पित्याने अनेकवेळा मुलीला मारहाण केली. यामध्ये या मुलीच्या आईने अनेकवेळा विरोध केला होता, मात्र या व्यक्तीने तिलाही निर्दयपणे मारहाण केली. 31 ऑक्टोबर रोजी रात्री वडिलांनी मुलीला जबरदस्तीने दुसर्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला खोलीतच डांबून ठेवले. मुलीने आपण ही गोष्ट पोलिसांना सांगणार असल्याची धमकी दिल्यानंतर पुन्हा या पित्याने मुलीला काठीने मारले. महत्वाचे म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये मुलीच्या आजीनेही आपल्या मुलाला साथ दिली. (हेही वाचा: लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके)
ही घटना घडल्यानंतर मुलीने शनिवारी रात्री आपल्या आईच्या फोनवरून 100 नंबरला कॉल करून पोलिसांना या सर्व घटनेची माहिती दिली. मात्र जोपर्यंत पोलीस गावात पोहचले तोपर्यंत हा बाप फरार झाला होता. मुलीला खोलीतून सोडवल्यानंतर जेव्हा मुलीची तपासणी झाली तेव्हा मुलीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या माहितीनुसार या पित्याने मुलीला तीन दिवस डांबून ठेऊन तिच्यासोबत दुष्कृत्य केले होते.