![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/09/Man-with-to-penis-updated-380x214.jpg)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) शनिवारी एका तरुणाने आपल्या मित्राचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापला आहे. शहरातील बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या देव (वय-34) याने मित्र बबलू उर्फ सागर रस्तोगी याच्या प्रायव्हेट पार्टचा जोरदार चावा घेऊन तो कट केला. बबलूने देवचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. या व्हिडीओद्वारे तो सतत देवला ब्लॅकमेल करत होता. याच त्रासाला कंटाळून देवने बबलूला एका हॉटेलच्या रूममध्ये बोलावून हे कृत्य केले. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
सध्या दोघांनाही गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या देवची त्यांच्या परिसरात राहणारा कंत्राटी सफाई कामगार बबलू याच्याशी खूप दिवसांपासून मैत्री होती. दोघेही बरेचवेळा एकत्र राहत होते. दोघांमध्ये अनेकवेळा शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. असेच एकवेळ शारीरिक संबंध ठेवताना बबलूने देवचा व्हिडिओ बनवला होता.
आरोपी देवचे म्हणणे आहे या व्हिडिओ क्लिपच्या नावाखाली बबलू त्याला ब्लॅकमेल करायचा, तसेच इतर मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचा. याच त्रासाला कंटाळून त्याने 10 सप्टेंबरच्या सकाळी बबलूला एका हॉटेलवर बोलावले. रिपोर्टनुसार तिथे या दोघांमध्ये ओरल संबंध झाले. त्यानंतर देवने रागाने बबलूचा प्रायव्हेट पार्ट कट केला. यानंतर दोघांमध्ये मोठी मारामारीदेखील झाली. (हेही वाचा: Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून)
निरीक्षक कोतवाली हिमांशू गिरी यांनी सांगितले की, मॉल गोडाऊन रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत दोन तरुण भांडणात जखमी झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.