G 20 Summit | Twitter

भारत यंदा 18 व्या G20 Summit च्या यजमानपदी आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश असलेल्या देशांचे प्रमुख भारतामध्ये काल दाखल झालेले आहेत. यंदा भारताने बांगलादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, यूएई, ओमान या देशांना विशेष आमंत्रित केले आहे. आरोग्य, व्यवहार, शिक्षण, सुरक्षा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर या समिट मध्ये चर्चा होणार आहे.

दिल्लीच्या प्रगती मैदानावर 'भारत मंडपम' उभारण्यात आले आहे. या मैदानावरच सकाळी 9.30 वाजल्यापासून पाहुणे येण्यास सुरूवात करणार आहेत. ऋषि सुनक यांनी काल ANI सोबत बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भारत हाच यंदाच्या जी 20 समीटचा योग्य यजमान असल्याचं म्हटलं आहे.

सकाळी सुमारे 10.30 वाजता G20 शिखर परिषदेचे पहिले सत्र: 'One Earth' चं आयोजन करण्यात आले आहे. G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या सत्रादरम्यान 'One Earth' हा चर्चेचा मुख्य विषय असेल. यामध्ये हवामान बदलाच्या परिणामांकडे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी उपायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. global net zero emission लवकरत आणण्याचा देखील सार्‍यांचा प्रयत्न असणार आहे.

आज संध्याकाळी राष्ट्रपतींकडून सार्‍या राष्ट्राध्यक्षांसाठी शाही भोजनाचं आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील परदेशी प्रतिनिधी संसद सदस्य आणि मंत्री यांच्या व्यतिरिक्त, G20 शिखर परिषदेच्या डिनरला देशाचे काही माजी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.