राज्यातील भाजपच्या (BJP) चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. संबंधित प्रकरणाची पुण्यात (Pune) तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), श्वेता महाले (Shweta Mahale), मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar), देवयानी फरांदे (Devayani Farande) या चार महिला आमदारांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. फसवणूक झालेल्या माधुरी मिसाळ या पुण्यातील पर्वती मतदार संघाच्या आमदार आहेत तर श्वेता महाले चिखलीच्या (Chikhali), मेघना बोर्डीकर जिंतूर (Jintur) आणि देवयानी फरांदे मध्य नाशिक (Nashik) या मतदार संघाच्या आमदार आहे. चार वेगवेगळ्या मतदार संघातील महिला आमदारांची अशी आर्थिक फसवणूक होणं ही बाब जरा विचित्र आहे तरी पोलिस संबंधित प्रकारणाचा तपास करत आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई आजारी असल्याचं खोट कारण सांगत चार वेगवेगळ्या मतदार संघातील भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या तरुणाचं नाव मुकेश राठोड (Mukesh Rathore) असं आहे. तो मुळचा मराठवाड्याचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोडने या तरुणाने 4 भाजप महिला आमदारांकडे मदत मागितली. मदत म्हणून आमदारांनी काही रक्कम ऑनलाइन (Online) माध्यमातून मुकेश राठोडला या तरुणास पाठवली. मात्र नंतर तो कॉल फेक (Fake Call) असल्याचे समजलं. त्यानंतर या चारही आमदारांनी त्या तरुणा विरोधात पोलिसात धाव घेतली आणि पुण्यातील बिबेवाडी पोलिस्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुकेश राठोड या तरुणाचा पोलीस शोध घेत आहे.(हे ही वाचा:-Ramdas Kadam: कुणाला मंत्री बनवलं म्हणजे भीक दिली असं समजू नका, रामदास कदम यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल)
आमदार म्हणून स्थानपन्न झालेल्या महिलांचीचं जर अशी फसवणूक होत असेल तर सर्वसामान्य महिलांनी ऑनलाईन पैसे व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. मुकेश राठोड या तरुणाने या ४ ही महिला आमदारांना फोन करुन सांगितले की माझ्या आईवर बाणेर (Baner) पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तरी त्यासाठी तिला भरती केलेलं आहे. संबंधित उपचारासह या नंबरवर गुगल पे (Google Pay) करावं. तरुणाची विनंती ऐकून या चार ही भाजप महिला आमदारांनी दिलेल्या नंबरवर ऑनलाईन ट्रान्सफर (Online Transfer) केली पण नंतर हा नंबर फेक असल्याचं कळल्या नंतर या चारही आमदारांनी मुकेश राठोड विरुध्द पुणे पोलिसात धाव घेतली.