माजी खासदार राहिलेला आणि आता तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी, बिहारमधील बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammad Shahabuddin) तीन वर्षांनंतर आपल्या कुटुंंबाला भेटला (Mohammad Shahabuddin Met Family). यावेळी पत्नी आणि मुलांना पाहून त्याला अश्रू अनावर झाले. मोहम्मद शहाबुद्दीन भावूक ( Mohammad Shahabuddin Got Emotional) झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या मान्यतेनुसार त्याला कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळाली.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर शहाबुद्दीन हा आपली पत्नी हिनाशहाब आणि मुलगा मोहम्मद ओसामा यांच्यासह आई आणि दोन मुलींना भेटला. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात शहाबुद्दीन याच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर माजी खासदार राहिलेल्या या व्यक्तीने 'सुपुर्द-ए-खाक' रस्ममध्ये सहभागी होण्यासाठी न्यायालयाकडे पॅरोल मागीतला होता. परंतू, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव न्यायालयाने पॅरोल नाकारला होता. (हेही वाचा, धक्कादायक! बिहार मध्ये जानेवारी- सप्टेंबर महिन्यापर्यंत दर दिवसाला 4 रेप किंवा सामूहिक बलात्काराचे गुन्हे दाखल)
न्यायालयाने माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याला सीवान येथे पाठविण्याबाबत दिल्ली आणि बिहार सरकारकडून अहवाल मागितला होता. मात्र, सुरक्षा पुरविण्याबाबत दोघांनीही हात वर केले. सरकारने सुरक्षा न देण्याचे कारणा सांगताना म्हटले की, शहाबुद्दीन याच्या सीवान येथे येण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जवानांची एक तुकडी लावूनही कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे कठीन होऊन बसू शकते.
दरम्यान, नवी दिल्ली येथील गीता कॉलनी येथील ताज इन्क्लेव येथील एका फ्लॅटमध्ये शहाबुद्दीन याने सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी कुटुंबीयांची भेट घेतली. हा फ्लॅट सीवाना येथील एका निकटवर्तीयाचा होता. आई, भाऊ, आजी यांच्यासोबत भेटण्यास गेलेल्या शहाबुद्दीन याच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. एकीचे शिक्षण अजून सुरु आहे. प्ररासमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शहाबुद्दीन याच्या एका डॉक्टर मुलीचा विवाह निश्चित झाला आहे.