Forbes World’s Top 20 Personalities 2020: फोर्ब्जने प्रसिद्ध केली जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी; दुष्यंत चौटाला, कन्हैया कुमार, महुआ मोइत्रा यांचा समावेश
Dushyant Chautala, Mahua Moitra and Kanhaiya Kumar (Photo Credits: Facebook/ANI)

प्रख्यात मासिक फोर्ब्सने (Forbes 2020) जगातील सर्वात प्रभावशाली 20 लोकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक पक्षाचे ज्येष्ठ नेते दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनीही आपली ताकद दाखवली आहे. या यादीत दुष्यंत सातव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, दुष्यंत चौटाला जगभरात एक आशावादी आणि उत्साही व्यक्ती म्हणून समोर आले आहे.

दुष्यंत चौटाला राजकारणात प्रवेश करून भारतीय इतिहासातील सर्वात तरुण खासदार झाले आणि आता ते हरियाणाचे उपमुख्यमंत्री आहेत. फोर्ब्सच्या या यादीमध्ये जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांचेही नाव आहे.

जगातील सर्वात प्रभावशाली 20 लोकांमध्ये कन्हैयाला फोर्ब्सने 12 वे स्थान दिले असून, प्रशांत किशोर 16 व्या क्रमांकावर आहेत. भारतीय राजकारणाच्या भविष्यात कन्हैया आपली मजबूत ओळख निर्माण करू शकतो, असे फोर्ब्सने आपल्या मासिकात म्हटले आहे. त्याचबरोबर राजकारणाच्या क्षेत्रात प्रशांत यांची भूमिकाही वाढणार असल्याचे सांगितले गेले आहे. या मासिकाने राजकीय भाष्यकार आणि विनोदकार हसन मिन्हाज (Hasan Minhaj) यांना प्रथम स्थान दिले आहे.

(हेही वाचा: Forbes Celebrity 100 List: विराट कोहली याने 'फोर्ब्स' 2019 सेलिब्रिटी 100 च्या यादीमध्ये मिळवले अव्वल स्थान)

याशिवाय या यादीत भारतीय वंशाचे युरोप निवासी आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सीएफओ आदित्य मित्तल, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा, थायलंडची राजधानी बँकॉकमधील इंडियन वंशाच्या शेफ गरिमा अरोरा यांचा समावेश आहे. या यादीमध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, पर्यावरणीय कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, फिनलँडचे नवे पंतप्रधान सना मारिन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा समावेश आहे.