गुजरातमध्ये मुसळधार पाऊस (Gujarat Heavy Rain) आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) यांच्याशी फोनवर चर्चा केली. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री पटेल यांनी पंतप्रधान मोदींना गेल्या 48 तासांतील राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. सीएम कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले की केंद्र सरकार (Central Govt) परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफसह (NDRF) सर्व आवश्यक मदत करेल. त्याचवेळी दक्षिण आणि मध्य गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. या भागातून सुमारे 1,500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, छोटा उदयपूरमधील बोदेली तालुक्यात रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अवघ्या 12 तासांत 433 मिमी पाऊस झाला, त्यामुळे सखल भागात पूर आला.
Tweet
PM @narendramodi calls Gujarat CM Bhupenda Patel; takes stock of flood like situation in some parts of the state. CM Patel appraises Prime Minister about heavy rains & possible flooding in some parts of state. PM assures all help from center including sending extra teams of NDRF
— DD News (@DDNewslive) July 11, 2022
48 तासांत भीषण परिस्थिती
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. छोटा उदयपूर आणि नर्मदा जिल्ह्यांत नद्यांना उधाण आले आहे. गुजरातमधील नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांतील 700 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याचवेळी छोटा उदयपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला. गुजरातमधील तापी जिल्ह्यातील पांचोल आणि कुंभिया गावांना जोडणारा पूल पावसाच्या सरीने वाहून गेला. त्याचबरोबर दक्षिण गुजरातमधील अनेक भागात नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून, त्यामुळे सखल भागात पूर आला आहे. (हे देखील वाचा: Amarnath Yatra 2022: अमरनाथ मध्ये झालेल्या ढगफुटीनानंतर काही काळ स्थगित केलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु)
आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे
यावर्षी पाऊस आणि पुरामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे. इकडे अहमदाबादमध्ये पावसामुळे वाईट स्थिती आहे. सर्वत्र पाणी तुंबले आहे. त्यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या 13 आणि एसडीआरएफच्या 16 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आणि मध्य गुजरातमधील 388 रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत.