FlixBus in India: जगभरात स्वस्त आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या फ्लिक्सबस (FlixBus) या जर्मन कंपनीने भारतातही आपली सेवा सुरू केली आहे. या महिन्यात कंपनीची पहिली इंटरसिटी सेवा सुरू झाली आहे. युरोप, यूएसए आणि तुर्कीमध्ये यशस्वीरित्या सेवा प्रदान केल्यानंतर, कंपनी आता जगातील सर्वात मोठ्या बस बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात आपले अनोखे व्यवसाय मॉडेल यशस्वी करण्याचे ध्येय ठेवत आहे. कंपनीने 2023 च्या उत्तरार्धात चिलीमध्ये आपली सेवा सुरु केली होती.
कालपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून FlixBus India ची तिकिटे भारतीय लोकांसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यांचे पहिले मार्ग येत्या 6 फेब्रुवारीपासून 99 रुपयांच्या विशेष किंमतीसह सुरू होत आहेत. हे मार्ग दिल्लीला अयोध्या, चंदीगड, जयपूर, मनाली, हरिद्वार, ऋषिकेश, अजमेर, कटरा, डेहराडून, गोरखपूर, वाराणसी, जोधपूर, धर्मशाला, लखनौ, अमृतसर यांना जोडतात. फ्लिक्सबस सुरुवातीला देशातील 46 शहरांमध्ये आपली सेवा प्रदान करेल.
Green light for the green bus revolution from Germany! A young middle class is keen on discovering wonderful 🇮🇳. Traveling with German @Flixbus - starting today - is the ideal collective & sustainable way! Happy to kick off with minister @kishanreddybjp & CEO @an_schwaemmlein. pic.twitter.com/OlvmQi4RdD
— Dr Philipp Ackermann (@AmbAckermann) February 1, 2024
FlixBus देशात आल्यानंतर हजारो भारतीयांकडे आता अनेक सोयीस्कर, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. फ्लिक्सबसने आपली सेवा सुधारण्यासाठी स्थानिक वाहतूकदारांशी करार केला आहे. याद्वारे फ्लिक्सबसला नेटवर्क नियोजन, महसूल व्यवस्थापन आणि उत्पन्न ऑप्टिमायझेशनमध्ये मदत मिळेल. फ्लिक्सबस आपले प्रवासी आणि ऑपरेटरसाठी उत्तम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करते. (हेही वाचा: RRB Technicians Recruitment 2024: रेल्वेमध्ये होणार तंत्रज्ञ पदांची भरती; तब्बल 9000 पेक्षा जास्त रिक्त जागा, जाणून घ्या सविस्तर)
महत्वाचे म्हणजे फ्लिक्सबस केवळ BS6 इंजिनसह प्रीमियम बस मॉडेल्सवर काम करत आहे. महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन फ्लिक्सबसने कोणत्याही महिला प्रवाशांच्या आसपासची जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची योजना आखली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी 24×7 रिस्पॉन्स टीम, ट्रॅफिक कंट्रोल वॉर्ड, सर्व आसनांसाठी 2-पॉइंट सीट बेल्ट आणि विशेष फ्लिक्सबस लाउंज यांसारख्या सुविधांचाही त्यात समावेश आहे. फ्लिक्सचे सीईओ आंद्रे श्वामलिन यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्याबद्दल उत्साह व्यक्त केला आणि शाश्वत, सुरक्षित आणि परवडणारा प्रवास देण्याच्या कंपनीच्या ध्येयावर भर दिला.