उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) येथून पतीच्या क्रूरतेचीएक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दारूच्या नशेत पतीने आधी पत्नीला लाठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिचा चावा घेतला. इतकेच नाही तर त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणे घुसवले. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे या कृत्यामध्ये आरोपी पतीच्या भावांनीही त्याला साथ दिली. महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर आरोपी भावाला पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील मतसेना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकालपूर गावातील असून, येथे 5 ऑगस्ट रोजी रात्री 28 वर्षीय रेश्माची पती सुरजीत याने हत्या केली. रेश्माचा विवाह सुरजीतसोबत 10 वर्षांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा नवरा तिचा छळ करत होता.
अहवालानुसार, 5 ऑगस्ट रोजी आधी दारूच्या नशेत असलेल्या सुरजीतने पत्नीला मारहाण करून तिचे हातपाय बांधले. त्यानंतर आरोपीने त्याच्या भावाला बोलावले व दोघांनी मिळून पुन्हा एकदा तिला मारहाण केली. नंतर तिचा अनेक ठिकाणी दातांनी चावा घेतला. इतके करूनही दोघांचे मन भरले नाही, त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणे घुसवले. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या पोटात लाटणे आढळून आले असून, तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. .
पोलिसांनी सुरजीतला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार महिलेची हत्या वेदनादायक पद्धतीने झाली आहे. ही हत्या ज्या क्रूर पद्धतीने करण्यात आली, ते पाहून तिच्या पतीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणात गंभीर कलमे वाढवण्यात येणार आहेत. पोलीस सुरजीतच्या भावाचाही शोध घेत आहेत. आरोपी पतीच्या भावाला लवकरच अटक करणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.