Fawad Chaudhry and Saif Ali Khan (Photo FB, Instagram)

Fawad Chaudhry on Saif Ali Khan Attack: पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. फवाद चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, हिंदू महासभेच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातील मुस्लिम कलाकारांना जीवाला गंभीर धोका आहे. पाकिस्तानने भारतीय मुस्लिमांच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. पाकिस्तानने भारताच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तान स्वत: अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रकरणांशी झगडत आहे आणि अशा परिस्थितीत तो भारताला सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे. सैफ अली खानवर हल्ला झाला असला तरी तो कोणत्याही कटाचा भाग नाही. कारण चोरट्याने रात्री चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोराला पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्याने घरातून पळून जाण्यासाठी भांडणादरम्यान सैफवर हल्ला केला.

सैफ अली प्रकरणात पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद खान यांची उडी

सैफ अली खानवर रात्री उशिरा हल्ला करण्यात आला

अभिनेता सैफ अली खानयाच्या वांद्रे येथील राहत्या घरी अज्ञात हल्लेखोराने चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेत्याच्या टीमने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे ही आभार मानले. डॉ. नीरज उत्तमणी, डॉ. नितीन डांगे आणि डॉ. लीना जैन यांनी ही शस्त्रक्रिया केली.