Marine Drive | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Facebook)

नुकतेच जगातील सर्वाधिक लोकप्रिय 25 शहरांची यादी (Favorite Cities in the World) जाहीर झाली आहे. यामध्ये भारतामधील दोन शहरांना स्थान मिळाले आहे. राजस्थानमधील उदयपूर (Udaipur) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात आवडते शहर ठरले आहे. ट्रॅव्हल प्लस लेझरने ही जगातील 25 सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांची यादी जारी केली आहे. या यादीत ओक्साकाला पहिले, तर उदयपूरला दुसरे, तर मुंबईला (Mumbai) या यादीत दहावे स्थान मिळाले आहे. ट्रॅव्हल अँड लीजर द्वारे जारी केलेले मार्किंग हे पर्यटकांनी केलेले सर्वेक्षण होते, ज्यामध्ये पर्यटकांनी शहराच्या खुणा, संस्कृती, खाद्यपदार्थ, खरेदी आणि स्थळांवर आधारित गुण दिले. या सर्वेक्षणात उदयपूर शहराला 93.33 रीडर स्कोअर मिळाला आहे.

दरवर्षी, ट्रॅव्हल प्लस लेझर जगातील सर्वोत्कृष्ट शहरे पुरस्कार सर्वेक्षण आयोजित करते, ज्यामध्ये पर्यटकांना जगभरातील त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांवर त्यांचे दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाते. यामध्ये त्यांना उत्तम हॉटेल्स, रिसॉर्ट्स, शहरे, बेटे, क्रूझ जहाजे, स्पा, एअरलाइन्स आणि इतर विविध पैलूंवर त्यांचे मत मांडण्याची संधी आहे. यंदा 2023 मध्ये अशा सहभागी पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जवळपास 165,000 व्यक्तींनी सर्वेक्षण पूर्ण केले. त्याद्वारे जगातील सर्वात आवडती शहरे निवडण्यात आली. (हेही वाचा: Best Hotel In The World: राजस्थानच्या जयपूरमधील Rambagh Palace ठरले जगातील सर्वोत्तम हॉटेल; जाणून घ्या मिळणाऱ्या सेवा आणि दर)

जगातील आवडती 25 पर्यटन स्थळे-

1. ओक्साका, मेक्सिको

2. उदयपूर, भारत

3.क्योटो, जपान

4. उबुद, इंडोनेशिया

5. सॅन मिगुएल डी अलेंडे, मेक्सिको

6. मेक्सिको सिटी, मेक्सिको

7.टोकियो, जपान

8. इंस्तंबूल, तुर्की

9. बँकॉक, थायलंड

10. मुंबई, भारत

11. चियांग माई, थायलंड

12. फ्लॉरेन्स, इटली

13. लुआंग प्राबांग, लाओस

14. माराकेश, मोरोक्को

15. रोम, इटली

16. मेरिडा, मेक्सिको

17. सिएम रीप, कंबोडिया

18. सिंगापूर

19. चार्ल्सटन, युनायटेड स्टेट्स

20. लिस्बन, पोर्तुगाल

21. सांता फे, युनायटेड स्टेट्स

22. होबार्ट, ऑस्ट्रेलिया

23. ग्वाडलजारा, मेक्सिको

24. पोर्तो, पोर्तुगाल

25. ओसाका, जपान

उदयपूरच्या सुरक्षिततेला जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाल्याबद्दल पर्यटन विभागाच्या संचालिका डॉ.रश्मी शर्मा यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘जगातील सर्वाधिक पसंतीच्या शहरांच्या यादीत उदयपुर समाविष्ट झाले आहे, यावरून शहराचा वारसा, कला-संस्कृती, पाककृती, आदरातिथ्य आणि लोकांबद्दलचा आदर दिसून येतो.’