Child | Pixabay.com

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये नवजात बालक आणि पत्नी ला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळावा म्हणून त्याच्या 3 वर्षाचा बाळाला विकावं लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेत 5 जणांना अटक केली आहे. यावेळी ज्यांनी बाळ विकत घेतलं त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेश मध्ये बारवा पट्टी येथील रहिवासी हरिश पटेल याने पत्नीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तो रोजंदारीवर काम करत होता. हरिशच्या पत्नीने जन्म दिलेले हे सहावे बाळ आहे.

हॉस्पिटलने बाळाला आणि आईला डिस्चार्ज हवा असल्यास तातडीने हॉस्पिटलचे बिल भरण्यास सांगितले. डिस्चार्ज मिळवण्याच्या घाई मध्ये त्याने आपल्या 3 वर्षाच्या मुलाचा सौदा केला.

अटक झालेल्यांमध्ये बाळ घेणारे पालक भोला यादव आणि कलावती, बोगस डॉक्टर तारा खुशावह आणि हेल्पर सुगंदी यांना अटक केल्याची माहिती सुपरीडंट ऑफ पोलिस संतोष कुमार मिश्रा यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलची देखील हाकालपट्टी केली आहे.

दरम्यान बाळाची देखील सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये अशाच प्रकारे, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एका नवजात मुलीला तिच्या वडिलांनी अलिगढच्या गांगिरी पोलीस स्टेशन परिसरातील एका खाजगी रुग्णालयात बाळ नसलेल्या एका जोडप्याला ₹ 56,000 ला विकल्याची बाब समोर आली होती. बाळाच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले, त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून पित्याला आणि मुलीला विकत घेणाऱ्या जोडप्याला ताब्यात घेतले.