प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

फरीदाबाद (Faridabad) येथील एका नवजात बालकाला दूधाऐवजी चहा-कॉफी घरातील मंडळींनी दिली. यामुळे बालकाच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर तीन दिवसांपूर्वी या नवजात बालकाचा जन्म झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बालकाच्या फुफ्फुसात चहा-कॉफी पाजल्याने संसर्ग झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु बालकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर नवाजात बालकाला दुध न देता चहा-कॉफी देण्यात आल्याने त्याच्या फुफ्फुसांना संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.(पश्चिम बंगाल: महिलेच्या पोटातून निघाले दीड किलो सोने आणि नाणी)

तर संसर्ग झाल्याने बालकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे 24 तासांसाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बालकाची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घरातील मंडळींना सांगितले आहे.